बंगालमधील बारासातच्या टीएमसी खासदार काकोली घोष यांनी गुरुवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रारीचं पत्र पाठवलंय.यात त्यांनी त्यांनी टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर संसदेत गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्याची तक्रार नोंदवली आहे.काकोली घोष यांनी २५ मे रोजीच टीएमसीच्या सर्व पदांचा राजीनामा दिलाय. इतकंच नाही तर मंगळवारी त्या मुख्यमंत्री शुभेंदू अधिकाऱीच्या प्रशासनिक समीक्षा बैठकीत टीमसीच्या सहा आमदारांसह सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे निवडणुकीतील दारुण पराभवानंतर आता तृणमुल काँग्रेसमधील अंतर्गत असंतोष बाहेर पडत असल्याचं दिसतंय.मंगळवारीच टीएमसीच्या तब्बल १०० नगरसेवकांनी राजीनाम दिलाय.