NEET प्रक्रियेवर PMO ची थेट नजर; पेपर पोहोचवण्यासाठी वायूदलाची मदत घेणार | NEET Exam | NDTV मराठी

नीट परीक्षा प्रक्रियेत आता भारतीय लष्कराची एन्ट्री होण्याची शक्यता आहे... पेपरफुटी रोखण्यासाठी नीटच्या सुरक्षेची जबाबदारी आर्मीला देण्याबाबत केंद्र सरकार गंभीर असल्याची माहिती मिळतीय.... प्रश्नपत्रिकांच्या गोपनीयतेसाठी लष्कराच्या सिक्युरिटी प्रोटोकॉलचा विचार करण्यात येतोय.संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी नीट सुरक्षेबाबत उच्चस्तरीय बैठक पार पडली... त्यात नीट प्रश्नपत्रिका देशभर पोहोचवण्यासाठी एअरफोर्स लॉजिस्टिक सपोर्टची चर्चा देखील करण्यात आली...इतकंच नव्हे, तर देशातील सर्व परीक्षा केंद्रांवर गोपनीय पेपर्स सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी भारतीय वायूदलाची मदत घेतली जाणार आहे.

संबंधित व्हिडीओ