गॅस सिलेंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाने पर्यायी व्यवस्था म्हणून रास्त भाव दुकानांमधून रॉकेल वाटप सुरू केले आहे. मात्र पूर्वी घराघरात वापरले जाणारे रॉकेल आता नागरिकांकडून नाकारले जात असल्याचे चित्र धाराशिवमध्ये दिसत आहे. रॉकेल घेण्यासाठी ग्राहकच येत नसल्याने आता दुकानदारांवर रॉकेलसाठी ग्राहक शोधण्याची वेळ आली आहे.