Jalgaon जामोद 'हत्याकांड' प्रकरणाला धक्कादायक वळण; मृत समजलेली शिवानी जिवंत? सापडलेला मृतदेह कोणाचा?

बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद हत्याकांड प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळालं आहे… राजुरा परिसरात शिरच्छेद अवस्थेत सापडलेल्या तरुणीच्या मृतदेहाचा उलगडा झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता… त्याच प्रकरणात वडील आणि भावालाही अटक करण्यात आली होती… मात्र आता या कथित हत्येतील तरुणी शिवानी हीच जिवंत अवस्थेत पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे… स्वतः समोर येत तिने आपल्या वडील आणि भावाला निर्दोष असल्याचं सांगितलं असून त्यांच्या सुटकेची मागणी केली आहे… या सगळ्या घडामोडींमुळे पोलीस तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता सापडलेला मृतदेह नेमका कोणाचा, हा खरा प्रश्न उभा राहिला आहे…

संबंधित व्हिडीओ