कल्याणमध्ये सर्वोदय सृष्टी सागर कॉम्प्लेक्समध्ये बोकडांची कुर्बानी प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल झाला.बाजारपेठ पोलीस ठाण्यात एका इमारतीचे सेक्रेटरी, चेअरमन आणि इतर पाच लोकांविरोधात गुन्हा दाखल झालाय. केडीएमसीच्या परवानगीशिवाय अवैधरित्या आणि निर्दयपणे बोकडांची कत्तल केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय. सकाळी सोसायटीच्या आवारात कोणत्याही प्रकारच्या कुर्बानीला पोलिसांनी मनाई केली होती.