पहलगाम हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने आता पोकळ धमक्या द्यायला सुरुवात केलीय.दररोज पाकिस्तानचा एखादा तरी नेता उठून भारताबद्दल गरळ ओकतोय.. सिंधूचे पाणी रोखले किंवा भारताने हल्ला केल्यास पाकिस्तान अण्वस्त्रांनी प्रत्युत्तर देईल.अशी धमकी रशियातील पाकिस्तानचे राजदूत मोहम्मद खालिद जमाली यांनी दिलीय.काही दिवसांपूर्वीच मरियम नवाज आणि पाकिस्तानचे रेल्वेमंत्री हनिफ अब्बासी यांनीही भारताला अणुबॉम्ब हल्ल्याच्या धमक्या दिल्या होत्या.