जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठे पाणलोट क्षेत्र असलेल्या हतनुर धरणातून वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन वाढलंय.परिणामी धरणाच्या जलसाठ्यात घट झाली आहे.गेल्या वर्षी मे महिन्यात धरणात 44.08% जलसाठा होता.मात्र सद्यस्थितीत धरणात 42.90% जलसाठा शिल्लक आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन टक्क्यांनी जलसाठ्यात घट झाली आहे. परिणामी पुढील काळात धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.