खरिपाच्या तोंडावर कपाशी बियाणे महागलंय.कापसाच्या बियाण्यात 37 रुपयांनी वाढ झाली.मागील वर्षी बीजी 2 कापसाची बॅग 864 रुपयांना असलेली कापूस बियाणे बॅग यंदा 901 रुपयाला मिळतेय.15 मे पासून हे कापूस बियाणे मिळणारेय.एक जून नंतर बीटी कपाशीच्या बियाण्याची लागवड करावी.असं आवाहन कृषी विभागाने केलंय.अमरावतीत 52 हजार हेक्टरवर कपाशी लागवड होण्याची शक्यता आहे... तर बियाणे दरवाढीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार.