Chembur दुर्घटनेप्रकरणी अभियंत्यांचं निलंबन, अभियंत्यांचं निलंबन मागे घ्या, आयुक्तांकडे मागणी

चेंबूरमध्ये झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर निलंबित करण्यात आलेल्या महापालिकेचे उपअभियंता अरुण मुंडे आणि सहाय्यक अभियंता योगेश पारटे यांच्या समर्थनार्थ आता महापालिका अभियंता संघटना मैदानात उतरली आहे.संघटनेने महापालिका आयुक्तांना पत्र लिहून दोन्ही अभियंत्यांचे निलंबन तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. या पत्रात दुर्घटना मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे घडल्याचा दावा करण्यात आला असून, ही नैसर्गिक आपत्ती असल्याचं म्हटलंय.. चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच अभियंत्यांवर कारवाई करणे अन्यायकारक आणि घाईगडबडीत घेतलेला निर्णय असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

संबंधित व्हिडीओ