Explainer| साखरेवर निर्यातबंदी, शेतकऱ्यांचं नुकसान; साखरेच्या निर्यात बंदीमागचं 'राजकारण' काय?

केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर ३० सप्टेंबरपर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत बंदी घातलीय. जागातील दुसऱ्या क्रमांकाच्या साखर उत्पादक भारताने निर्यातबंदी केल्यामुळे जागतिक पातळीवर साखरेच्या भावात वाढ होण्याची चिन्हं आहेत.आखातातली युद्धजन्य परिस्थिती, त्यामुळे रोखला गेलेला कच्च्या तेलाचा पुरवठा, परिणामी महागाई वाढण्याची निर्माण झालेली शक्यता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यंदा जगभरात अलनिनोचा परिणाम जाणवणार अस ल्याने पर्जन्यमान घटणार आहे. त्यामुळे ऊसाचं उत्पादनही घटण्याची शक्यता लक्षात घेता केंद्र सरकारने हा निर्णय घेतलाय. निर्यातबंदीच्या निर्णयामुळे यंदा आणि पुढच्या वर्षासाठीसुद्धा देशांतर्गत बाजारात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असेल आणि दर नियंत्रणात राहतील, असा केंद्र सरकारचा अंदाज आहे.

संबंधित व्हिडीओ