NDTV मराठीच्या बातमीचा Impact, कॅनमध्ये भरुन दिलेलं शेकडो लिटर इंधन घेतलं परत Shirdi | Petrol Diesel

शिर्डीत इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक वापरासाठी मोठ्या प्रमाणात इंधनाची बेकायदेशीर साठवणूक होत असल्याचा प्रकार एनडीटीव्ही मराठीनं उघडकीस आणला.. साईसिद्धी पेट्रोलियम पंपावर प्लास्टिकच्या कॅन आणि ड्रममध्ये शेकडो लिटर डिझेल भरून दिलं जात असल्याचं चित्र समोर आलं.. विशेष म्हणजे, ही बातमी प्रसारित होताच पंप व्यवस्थापकाने भरून दिलेले इंधन पुन्हा ड्रममधून टँकमध्ये ओतून घेतलंय.. सामान्य नागरिकांना इंधन देताना नियमावली आणि निर्बंध दाखवले जातात, मात्र ‘सेटिंग’ असलेल्या काहींना बिनधास्तपणे शेकडो लिटर इंधन कसे दिले जाते? असा सवाल उपस्थित होत आहे.

संबंधित व्हिडीओ