आपल्या निर्णयांनी चर्चेत आणि तितकेच वादात असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांची नजर आता अफगाणिस्तानातील एक एअरबेसवर पडलीय... तालिबानने बगराम एअरबेस अमेरिकेला द्यावं, नाहीतर परिणामांना तयार व्हावं, असा इशाराच ट्रम्प यांनी दिलाय. त्याला तालिबानकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलंय. पण, सैन्य माघारी घेतल्यानंतरही अमेरिकेला बगराम एअरबेस का हवंय? अमेरिकेसाठी हे एअरबेस इतकं महत्वाचं का ? आणि अमेरिकेला बगराम एअरबेस मिळालं तर चीनसाठी तो धोका आहे का? जाणून घेण्यासाठी पाहूया हा रिपोर्ट