शेगावातील भेसळयुक्त पेढा विक्रेत्यांना FDAचा दणका, गजानन महाराज मंदिर परिसरात कारवाई

शेगावमध्ये गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आता धक्कादायक बातमी श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरातील एका पेढे विक्रेत्याच्या पेढ्यांचे दोन नमुने अन्न आणि औषध प्रशासनाच्या नागपूर प्रयोगशाळेत नापास ठरलेत.तपासणीदरम्यान पेढ्यांमध्ये पाम तेल आणि हानिकारक कृत्रिम रंग वापरल्याचं आढळून आलंय. या अहवालाच्या आधारे आता संबंधित विक्रेत्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती बुलढाण्याचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांनी दिलीय.

संबंधित व्हिडीओ