4 Big news | घराच्या बजेटसंदर्भातील 4 मोठ्या घडामोडी; शेअर बाजाराची ते संभाव्य महागाईचे अपडेट्स एप्रिल महिना सुरू झालाय, पगारवाढीचे दिवस आहेत, त्यामुळे नोकरदारवर्गात उत्सुकता असतानाच नोकरदारांच्या या आनंदावर महागाईचं विरजण पडण्याची शक्यता आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या टॅरिफ वॉरचे पडसाद भारतीय शेअर बाजारात पाहायला मिळाले. शेअर बाजारात कालचा दिवस सोमवार ब्लॅक मंडे ठरलाय. तर कच्चा तेलाच्या दरात गेल्या चार वर्षातली ऐतिहासिक घसरण झालीय. हे कमी होतं की काय तर दुसरीकडे केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात 2 रुपयांची वाढ केलीय, या सगळ्याचा परिणाम सोन्यावर देखील झालाय, सोन्याच्या दरात मोठी घसरण झालीय.