गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पावसाने कोरची तालुक्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालंय.कोरची तालुक्यातील मुख्य उत्पादनाचे साधन हे भाताची शेती आहे.मात्र मुसळधार पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान झालंय.धान्याचे पीक निघाल्यामुळे शेतकरी धान्य कापणीला जोमाने लागले.आणि धान्य कापून वाळविण्याकरिता आपल्या शेतात ठेवले होते.परंतु काल रात्री विजाच्या कडकडाटासह अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झालंय.