गडचिरोली जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः भामरागड तालुक्यात अनेक भाग जलमय झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत असल्याने जिल्ह्यातील 24 प्रमुख मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर पूरग्रस्त भागातील सुमारे 700 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून त्यांच्या निवासाची व्यवस्था आश्रमशाळा आणि इतर सुरक्षित ठिकाणी करण्यात आली आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी.