Mumbai| Gas cylinder च्या दरामध्ये दुपटीने वाढ; गॅसमुळे छोटे हॉटेल व्यावसायिक त्रस्त

व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरामध्ये मार्च महिन्यापासून दुपटीने वाढ झाली आहे. यामुळे छोटे हॉटेल व्यवसायिक त्रस्त झाले आहे. 1680 रुपयाला मिळणारा गॅस सिलेंडर बत्तीसशे रुपयावर पोहोचला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हॉटेल चालकांना पदार्थांची दरवाढ करावी लागणार आहे. मात्र दरवाढ केली तर ग्राहक दुरावेल आणि दरवाढ नाही केली तर व्यवसाय अडचणीत येईल अशा दुहेरी कात्रीत हॉटेल व्यवसाय सापडला आहे. असंच चालत राहिलं तर एक दिवस हॉटेल व्यवसाय बंद करावा लागेल अशी भीती हॉटेल चालकांना आहे

संबंधित व्हिडीओ