रशियानंही युक्रेनच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या शहरावर ड्रोन हल्ला चढवलाय.खारकीव्हवर झालेल्या हल्ल्यात ४७ जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली शुक्रवारी रात्री उशिरा खारकीव्हमध्ये १२ ठिकाणी हे हल्ले झाले.रहिवासी इमारती, पायाभूत सुविधा, वाहनं यांचं या हल्ल्यात नुकसान झालंय.रशियानं १८३ ड्रोन डागल्याचा दावा युक्रेनियन हवाई दलानं केलाय. त्यातील ७७ ड्रोन हल्ले परतवून लावण्यात आले.तर ७३ ड्रोन भरकटले. तर रशियानं दोन बॅलिस्टिक मिसाईल्स डागल्याचाही दावा करण्यात आलाय.