भारताविरोधात त्याच्या शेजाऱ्यांची घातक त्रिकोणी युती तयार होतेय. पाकिस्तान-चीन हे दोन्ही शेजारी भारताचे पक्के वैरी आहेतच, त्यांना आता साथ मिळतेय ती बांगलादेशची... बांगलादेशात सध्या भारतविरोधी वातावरण तयार झालंय. तिथं भारताविरोधात हिंसक आंदोलनं सुरु असतानाच एक चीनी कावा समोर आलाय. चीन बांगलादेशमध्ये एक एअरबेस आणि त्याच्या समुद्रात ८ पाणबुड्यांसाठी तळही बांधतोय. गुरुवारी संसदेत परराष्ट्र मंत्रालयाच्या स्थायी समितीनं हा अहवाल सादर केलाय. त्यामुळे भारताची चिंता वाढली आहे. चीनच्य़ा या रणनीतीमागे काय कारणं आहेत, भारताकडे यावर काय उत्तर आहे, पाहूया एक रिपोर्ट....