पुणे आणि नाशिकमध्ये बिबट्यांचा वावर आता नेहमीचा झालाय. तिथले लोकही आता सतर्क झालेत. पण जिथे कधी बिबट्या शिरेल असा अंदाजही कुणी बांधला नसेल तिथेच सकाळी सकाळी बिबट्याचं दर्शन झालं तर... मिरा भाईंदरमध्ये नेमकं हेच घडलंय... भाईंदर पूर्वमध्ये एका सोसायटीत बिबट्या शिरला आणि नागरिकांचा थरकाप उडाला. बिबट्याच्या हल्ल्यात 7 जण जखमी झालेत. तब्बल 7 तास बिबट्याचा हा थरार पाहायला मिळाला... पाहूया एक रिपोर्ट