शिवसेना-भाजप युतीचं दीडशे जागांवर एकमत झालं, असं दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी सांगितलंय... पण ओठावरचा आकडा वेगळा आणि पोटातला वेगळा... असं आहे की काय, असा प्रश्न पडलाय... कारण गेल्या वेळच्या निवडणुकीत ज्यावेळी शिवसेना एकसंध होती, त्यावेळी शिवसेनेचे जे ८४ नगरसेवक निवडून आले, त्या ८४ जागा शिंदेंना द्यायला भाजपचा विरोध असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यात अजूनही काही धुसफूस सुरू आहे का आणि मुंबईत भाजप शिंदेंना झुंजवणार का..... पाहुया एक रिपोर्ट....