भूतान, नेपाळ या भारताच्या शेजारी राष्ट्रांसह पश्चिम बंगालमध्येही मुसळधार पावसानं धुमाकूळ घातलाय. नेपाळमध्ये भूस्खलन झालंय तिथं ४७ जणांचा बळी गेलाय. तर प. बंगालच्या भूस्खलनातही 17 जणांचे जीव गेलेत..,भूतानमधील पुराच्या दृश्यांनी तर धडकी भरलीय. भूतानमधील पुराचा भारतालाही धोका निर्माण झालाय. देशात तर यंदा मुसळधार पावसानं मोठं तांडव घातलं. अनेकवेळा ढगफुटी., भूस्खलनाच्या घटनांनी देश हादरून गेला. तर आता पश्चिम बंगालसह नेपाळ भूतानमध्ये निसर्गानं रौद्रावतार दाखवला. पाहूया काय घडलंय, किती हानी झाली ते