महिला वनडे क्रिकेट विश्वचषकात भारताने पाकिस्तानचा दारूण पराभव केला आहे.. भारताने विजयासाठी 247 धावांचं आव्हान दिलं होतं. पाकिस्तानचा डाव फक्त 159 धावांवर आटोपला. भारताने हा सामना 88 धावांनी जिंकला आणि गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. भारताने वनडे क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा सलग 12 वा पराभव केला आहे. आतापर्यंत पाकिस्तानला एकही सामना भारताविरुद्ध जिंकता आलेला नाही. भारताने सुरुवातीच्या दोन सामन्यात विजय मिळवत 4 गुण आणि +1.505 नेट रनरेटसह पहिलं स्थान गाठलं.