उद्धव आणि राज ठाकरे आज एकाच कार्यक्रमात हजर राहिले. कार्यक्रमानंतर राज ठाकरे मातोश्री निवासस्थानीही पोहोचले.. ठाकरे बंधुंमधली ही वाढती जवळीक पाहून कार्यकर्त्यांना दिलासा वाटतोय.. मात्र अनेकांच्या मनातली धाकधुकही वाढलीय. आगामी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव आणि राज ठाकरे यांची युती होणार असल्याची चर्चा रंगलीय. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आनंदात आहेत. मात्र ठाकरेंचे माजी नगरसेवक गॅसवर असल्याची चर्चा रंगलीय. ठाकरेंच्या युतीमुळे माजी नगरसेवकांची धास्ती का वाढलीय पाहुयात या रिपोर्टमधून..