आखाती देशात पुन्हा एकदा युद्धाचे ढग दाटून आलेत.. अमेरिकेच्या बॉम्बहल्ल्यांनंतर इराणनेही आक्रमक भूमिका घेतलीय.इराणने आखातातील अनेक देशांना लक्ष्य केल्यामुळे संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलंय.नवीन सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांच्या नेतृत्वाखाली इराणचा सूर अधिक आक्रमक झाल्याचं चित्र आहे.या संघर्षामागे होर्मूझ सामुद्रधुनीचं सामरिक महत्त्व, आखाती देशांतील सत्ता-संतुलन आणि इराणच्या अणुकार्यक्रमाचा वाद अशा अनेक कारणांचा गुंता असल्याचं दिसतंय.नेमकं हे युद्धाचं वातावरण कसं निर्माण झालं? अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांनाच इराण का लक्ष्य करतंय? आणि या संघर्षाचा जागतिक तेलबाजारावर काय परिणाम होऊ शकतो? पाहुयात या विशेष रिपोर्टमधून.