सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येतेय. नीरा नदीच्या काठावर असलेल्या होळ या गावामध्ये अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.. एका शेतकऱ्याच्या गोठ्यावर छापा टाकून, चक्क केमिकलपासून तयार करण्यात येणारं बनावट दूध जप्त करण्यात आलंय.. याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे