वारी म्हणजे सेवा, समर्पण आणि भक्तीचा संगम. याच भावनेतून ‘स्ट्रीट सेन्स’ या स्वयंस्फूर्त गटाने गेल्या २०१४ पासून एक अनोखा उपक्रम सुरू ठेवला आहे. आयटी इंजिनिअर्ससह विविध क्षेत्रातील १६ बाईक रायडर्स बाईक एम्ब्युलन्सच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या मदतीला धावत आहेत.. कोणतीही अपेक्षा न ठेवता केली जाणारी ही सेवा आत्मिक समाधान देणारी असून, वारकऱ्यांच्या रूपात विठ्ठलाचे दर्शन घडते, अशा भावना या सेवाभावी युवकांनी व्यक्त केल्या आहेत. यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांनी.