पिंपरी-चिंचवडच्या मोशीत घडलेली दुर्घटना ही केवळ अपघात नव्हती... ती प्रशासनाच्या हलगर्जीपणाची किंमत होती का ? हा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे. मोशी येथील कचरा डेपोच्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात तब्बल ८१ तास मृत्यूशी झुंज देणाऱ्या बचाव पथकाने ९ जणांना जिवंत बाहेर काढलं... पण दुर्दैवाने ९ जणांचे मृतदेहच हाती लागले. कुणाचा बाप गेला... कुणाचा भाऊ... तर कुणाचा अवघ्या दोन महिन्यांपूर्वी वसलेला संसारच उद्ध्वस्त झाला. मात्र, या ९ निष्पाप मृत्यूंची जबाबदारी नेमकी कोण घेणार ? NDTV मराठीचा हा विशेष ग्राऊंड रिपोर्ट...