गोकुळ दूध संघाने म्हैस आणि गाय दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.उद्यापासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.मुंबई, पुण्यात प्रतिलिटर 74 रुपये, तर कोल्हापूरसह इतर ठिकाणी लिटरला 68 रुपये मोजावे लागणार आहेत.संघाने जानेवारीमध्ये म्हशीच्या दुधाचा दर, तर महिन्यापूर्वी गाईच्या दुधाचा खरेदी दर दोन रुपयांनी वाढवला होता. त्यानंतर आता पुन्हा विक्री दरात वाढ झाली.दिवसेंदिवस विक्रीमध्ये होत असलेल्या दरवाढीचा ग्राहकांना फटका बसणार आहे. अमूल आणि मदर डेअरीने एक मे पासून दरवाढ केल्यामुळे गोकुळने देखील ही दरवाढ केली आहे.