मुंबईकरांना दिलासा! मुंबईला पाणीपुरवठा करणारी सातही धरणं काठोकाठ भरली आहेत. धरणांमध्ये एकूण ९९.४६ टक्के पाणीसाठा झाला आहे. मोडकसागर, विहार आणि तुळसी या धरणांमध्ये १०० टक्के पाणीसाठा नोंदवला गेला आहे. मागील २४ तासांत धरणक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे हा पाणीसाठा वाढला आहे.