महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा सक्ती करण्याच्या निर्णयावर जनतेची मतं जाणून घेण्यासाठी नरेंद्र जाधव समितीने पुढाकार घेतला आहे. यासाठी एक संकेतस्थळ तयार करण्यात येणार आहे. यासोबतच समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचीही भेट घेऊन त्यांची भूमिका जाणून घेणार आहेत.