मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी 'तुम्हाला मुंबईचा महापौर खान चालेल का?' असा प्रश्न विचारून मुंबई महापालिका निवडणुकीच्या राजकारणाला नवी दिशा दिली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुस्लीम समाजाने उद्धव ठाकरेंना पाठिंबा दिला होता. आता भाजपच्या या भूमिकेमुळे मुंबई महापालिकेतील राजकीय समीकरणे कशी बदलतील, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.