मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकणाऱ्या आरोपींचा शोध घेणे पोलिसांसाठी आव्हानात्मक बनले आहे. पुतळ्याजवळ सीसीटीव्ही असूनही, त्यात स्पष्ट फुटेज दिसत नसल्याने आरोपींना ओळखणे अवघड झाले आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आठ पथके तयार केली आहेत. आता पोलीस आजूबाजूच्या इमारतींमधील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.