वाशिमच्या मानोरा येथे सकल बंजारा समाजाकडून एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. हैदराबाद गॅझेटच्या अनुषंगाने ही मागणी करण्यात येत असून, या मोर्च्यात हजारोंच्या संख्येने बंजारा समाजबांधव सहभागी झाले होते. मोर्चात 'एकच मिशन – एसटी आरक्षण' अशा जोरदार घोषणा दिल्या जात होत्या.