गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील भिलाड येथे सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरचा सायबर क्राईम टीमने पर्दाफाश केला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील एका हॉटेलमधून चालणाऱ्या या कॉल सेंटरमधून परदेशी नागरिकांना लुबाडले जात होते. या कारवाईत मुंबई आणि परिसरातील १२ जणांना अटक करण्यात आली असून, संगणक आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.