मराठा आरक्षणासाठी जीआर काढल्यानंतर मराठा आणि ओबीसी समाजांमधील वाद चांगलाच पेटला आहे. ओबीसी नेत्यांसह अनेक संघटना आक्रमक झाल्या असून, लोकशाही मार्गाने आरक्षण वाचवण्यासाठी लढा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यभरातील प्रत्येक तालुक्यात आंदोलनाची जोरदार तयारी सुरू आहे.