अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला सुप्रीम कोर्टाने मोठा झटका दिला आहे. न्यायालयाने जया शेट्टी हत्याकांडात त्याच्या शिक्षेवरील स्थगिती उठवून त्याचा जामीन रद्द केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या जामिनाविरोधात सीबीआयने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. कोर्टाने सीबीआयचे अपील स्वीकारले आणि 'तुमचे नाव पुरेसे आहे' असे म्हणत राजनच्या वकिलांचा युक्तिवाद फेटाळला.