लातूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळले आहे. शेतीत गुडघाभर पाणी साचले असून, विशेषतः सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे कष्ट वाया जाण्याची वेळ आल्याने त्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदतीची मागणी केली आहे.