हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी शहरात ओबीसी समाजाने भव्य 'एल्गार मोर्चा' काढला. मोर्चा सुरू होण्यापूर्वी ओबीसी बांधवांनी लक्ष्मण हाके यांचे जंगी स्वागत केले. कळमनुरी ते हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर स्वागतासाठी मोठी गर्दी झाली होती. यावेळी नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरही टीका केली.