पाटणा उच्च न्यायालयाने काँग्रेस पक्षाला मोठा धक्का देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईच्या एआय व्हिडिओला सर्व सोशल मीडियावरून हटवण्याचे आदेश दिले आहेत. बिहार निवडणुकीपूर्वी काँग्रेसने जारी केलेल्या या व्हिडिओमध्ये मोदींची आई त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांच्याशी बोलताना दाखवले आहे, ज्यावर भाजपने जोरदार आक्षेप घेतला होता.