मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना अडचणी येत आहेत. कारण, पुतळ्याच्या थेट देखरेखीसाठी एकही स्पष्ट सीसीटीव्ही कॅमेरा उपलब्ध नाही. त्यामुळे पोलीस सध्या आजूबाजूच्या इमारती आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, 8 पथके आरोपीचा शोध घेत आहेत.