सोलापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने ४७ हजार हेक्टरहून अधिक पिकांचे नुकसान झाले आहे. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि मोहोळ तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सीना आणि भीमा नदीवरील १५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत, ज्यामुळे परिसरातील परिस्थिती गंभीर झाली आहे.