मनोज जरांगे पाटील यांनी 'चलो दिल्ली'चा नारा देत देशभरातील मराठा समाजाचे दिल्लीत अधिवेशन घेण्याची घोषणा केली आहे. हैदराबाद आणि सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीनंतर हे अधिवेशन होणार असून, कोणत्याही मागण्यांसाठी नाही तर राज्याराज्यांतील मराठा बांधवांना एकत्र आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. लवकरच या अधिवेशनाची तारीख जाहीर होईल.