मुंबईतील शिवाजी पार्क येथे मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर एका अज्ञात व्यक्तीने लाल रंग फेकला. या घटनेनंतर शिवसैनिकांनी पुतळा साफ केला. राज ठाकरे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली, तर उद्धव ठाकरे यांनीही पुतळ्याची पाहणी केली. राज ठाकरेंनी आरोपींना २४ तासांत शोधण्याचा अल्टिमेटम दिला असून, उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे.