महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं सावट गडद होऊ लागलं आहे. गेल्या आठवडाभरापासून अवकाळीनं मोठं नुकसान झालंय. नाशिकच्या वडनेर भैरव परिसरात काल सायंकाळ सुमारास झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने अक्षरक्ष: थैमान घातले. त्याचा सर्वाधिक फटका द्राक्ष बागांना बसला असून, द्राक्ष बागांमध्ये अक्षरश: दीड ते दोन फुटांपर्यंत पाणी साचले होते.तर सांगली, गडचिरोली, पुण्यातही अवकाळी पावसानं थैमान घातलंय. पाण्याच्या जोरामुळे शेतातील माती वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले असून जनजीवनही विस्कळीत झालेय.