देशभरात कोरोना संसर्गाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.देशात कोविडच्या सक्रिय रुग्णांची संख्या ३,३९५ वर पोहोचली आहे,केरळमध्ये सर्वाधिक १३३६ सक्रिय रुग्ण आहेत.तर गेल्या २४ तासांत ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, दिल्ली, केरळ, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.