उद्यापासून शिवाजी पार्कात तीव्र आंदोलन; आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, तेजस ठाकरेंचा Dadar मध्ये ठिय्या

दादरमध्ये पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं. सीजेपीच्या समर्थनार्थ आज आंदोलनाची हाक देण्यात आली होती... त्यापार्श्वभूमीवर दिवसभरात पोलिसांकडून तरुणांची धरपकड करण्यात आलीय.. त्यानंतर ताब्यात घेतलेल्यांना सोडण्यासाठी आदित्य ठाकरे, अमित ठाकरेंसह तेजस ठाकरे मैदानात उतरले होते.. त्यांनी ठिय्या आंदोलन करत पोलिसांच्या भुमिकेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला...त्यांनंतर शिवाजी पार्क पोलिस स्टेशनमध्ये आंदोलनही केलं... दरम्यान, उद्या शिवाजी पार्कात आंदोलन सुरु करणार असल्याची घोषणा अमित ठाकरेंनी केलीय.. दिल्लीच्या आदेशानुसार पोलिसांकडून कारवाई केली जात आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.

संबंधित व्हिडीओ