इस्रायलने गाझा पट्टीत गेल्या २४ तासांमध्ये केलेल्या हल्ल्यांमध्ये १४६ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झालाय. तर ४५९ जण जखमी झाल्याची माहिती येथील आरोग्य अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली. मार्चमध्ये युद्धबंदी मोडल्यानंतर गुरुवारपासून इस्रायलने गाझावरील हवाई हल्ले अधिक तीव्र केले आहेत. दरम्यान, गाझात मध्यरात्रीपासून ५८ जणांचे मृतदेह आढळले असून अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकलेत. अशी माहिती उत्तर गाझा येथील इंडोनेशियन रुग्णालयाचे संचालक मारवान अल सुल्तान यांनी दिली.गेल्या १९ महिन्यांच्या युद्धादरम्यान इस्रायल सैन्याने केलेल्या हल्ल्यांत रुग्णालयांचेच नुकसान झालंय.तर मार्चमधील नाकेबंदीनंतर वैद्याकीय सामग्रीपुरवठा बाधित झाला असल्याचे ते म्हणाले.