इस्त्रोच्या EOS-09 उपग्रहाचे प्रक्षेपण अयशस्वी ठरलंय.प्रक्षेपणाच्या तिसऱ्या टप्प्यात तांत्रिक अडचणी असल्यानं हे प्रक्षेपण अयशस्वी ठरलंय. घुसखोरी आणि संशयास्पद हालचाली शोधण्यासाठी या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात येणार होतं.दहशतवादविरोधी कारवाईत ईओएस 09 हे उपग्रह उपयोगी ठरणार होतं.मात्र तिसऱ्या टप्प्यात आलेल्या अडचणींमुळे त्याचं प्रक्षेपण अयशस्वी झालंय. आता पुन्हा एकदा इस्त्रोकडून या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्याची तयारी सुरू आहे.