सुप्रिया सुळे सोडून शरद पवार गटाच्या सर्वच खासदारांना फोन आलेला होता असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. बाप लेकीला सोडून द्या असं खासदारांना सांगण्यात आल्याचा दावाही जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. दुसरीकडे तटकरेंनी फोन केला असेल असं वाटत नाही असं रोहित पवार म्हणतायत. तसं शरद पवार गटाच्या खासदारांनी देखील फोन आला नसल्याचं म्हटलंय. आता यामध्ये नेमकं खरं कोण बोलतंय हे लवकरच स्पष्ट होणार आहे.